शिक्षक संघटनांच्या मागणीमुळे नवीन शिक्षक भरती रखडली
शासनामार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरती अगदी अंतिम टप्प्यात येवून फक्त नियुक्ती आदेश देण्याचे काम शिल्लक होते. पण शिक्षक संघटनांनी एकत्र येत प्रथम लांबणीवर पडलेला जिल्हांतर्गत बदल्यांची मागणी केल्यामुळे शासनाला संघटनांपुढे नमते धोरण घ्यावे लागले आहे. त्यामुळे प्रथम जिल्हांतर्गत बदल्या कराव्यात, असे एका दिवसात आदेश काढण्यात आल्यामुळे आता शिक्षकांच्या सोयीसाठी नवीन भरती रखडली आहे.प्रथम जिल्ह्यांतर्गत शिक्षक बदल्या कराव्यात असे एका दिवसात आदेश काढले. यामुळे आता शिक्षकांच्या सोयीसाठी नवीन भरती रखडली आहे. बुधवारी जिल्ह्यांतर्गत बदल्यांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यांतर्गत बदलीचा प्रश्न सोडविल्यानंतरच नवीन उमेदवारांसाठी समूपदेशन घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.www.konkantoday.com