
महाराष्ट्रातील सर्व आशांना दरमहा ५ हजार रु. मानधनवाढीचा निर्णय
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणे उंबरठ्यावर असताना महाराष्ट्रातल्या सर्व आशा गटप्रवर्तक महिलांचे पाच हजार रुपये मानधन वाढीचा मंत्रिमंडळाचा निर्णय घेतल्याची माहिती अखिल भारतीय आशा गटप्रवर्तक आयटक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकर पुजारी यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील १ हजार १३३ आशा व गटप्रवर्तक कर्मचार्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.www.konkantoday.com