प्रवाशांना नाहक त्रास दापोली आगार प्रवेशद्वाराशी पुन्हा खोदकाम
एस.टी. बसच्या ताफ्यात आता इलेक्ट्रीक बस धावणार असल्याने त्यांच्या चार्जिंग पॉईंटचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु याच्या केबल टाकण्यासाठी आगाराच्या मुख्य द्वाराशीच खोदकाम करण्यात आल्याने प्रवाशांना धुळीशी सामना करावा लागत आहे.दापोली आगाराच्या प्रवेशद्वाराशी मागील काही वर्षापासून मोठा खड्डा पडला होता. यामुळे पावसाळ्यात प्रवाशाना मोठा त्रास सहन करावा लागल्यानंतर काही महिन्यापूर्वी या ठिकाणी प्लेवर ब्लॉक बसवण्यात आले होते. www.konkantoday.com