
प्रथम जन्मलेल्या मुलीला पाच हजार रुपये आणि मातेला एक साडी भेट देऊन गौरवण्याचा निर्णय कोंडिवरे ग्रामपंचायतीने घेतला
मेरी लाडली, मेरा सहारा’ हा अनोखा उपक्रम राबवत प्रथम जन्मलेल्या मुलीला पाच हजार रुपये आणि मातेला एक साडी भेट देऊन गौरवण्याचा निर्णय कोंडिवरे ग्रामपंचायतीने नुकत्याच झालेल्या मासिक सभेत घेतला.संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे ग्रामपंचायतीची मासिक सभा नुकतीच सरपंच सायली केंबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपसपंच जाकीर शेकासन, ग्रामपंचायत सदस्य संदीप कदम, फरिदा माद्रे, शबनम कापडी, शहनाज कापडी उपस्थित होते. ग्रामसेवक संदीप शेडगे यांनी इतिवृत्त वाचले ते कायम करण्यात आले. या वेळी विविध विषयांवर व विकासकामांवर चर्चा करण्यात आली.१५वा वित्त आयोग अंतर्गत विकासकामांना मंजुरी देण्यात आली. ‘मेरी लाडली’, हा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये याबाबत निर्णय झाला असून, या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. www.konkantoday.com