
दापोलीत मद्यधुंद परप्रांतीय तरूणांकडून गाड्यांची तोडफोड
शांततेसाठी ओळखल्या जाणार्या दापोली शहरात रात्री नागालँडमधील २० वर्षीय तरूणाने दारूच्या नशेत चारचाकी गाड्यांचा काचा फोडून तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. तसेच रस्त्यालगत उभ्या असणार्या दहा ते बारा मोटारसायकल व मोपेड ढकलून त्या रस्त्यावर आडव्या पाडल्या. यामध्ये सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी विलोका व्ही. सुनी (२०, मूळ इगोटे, ता. सिटीमेड हाऊन जिल्हा फिफिरे, राज्य नागालँड, सध्या -पोस्टाची गल्ली, दापोली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या मानसिक स्थितीची तपासणी करण्यात येत आहे.
या घटनेबाबत योगेश दत्तात्रय वैद्य (५३, पोस्टाची गल्ली, दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या स्वतःच्या इर्टिगा, तसेच सुशील शशिकुमार मिसाळ यांच्या वेगनआर कारचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.www.konkantoday.com




