
चाकरमान्यांसाठी सुविधा उपलब्ध कोकण मार्गावर १५ पासून दोन होळी स्पेशल
शिमगोत्सवासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या एलटीटी थिविम, पुणे-थिविम साप्ताहिक होळी स्पेशल १५ मार्चपासून कोकण मार्गावर धावणार आहेत.०११०७/०११०८ क्रमांकाची एलटीटी-थिविम साप्ताहिक स्पेशल १५, २२ व २९ मार्चला धावेल. शुक्रवारी धावणारी स्पेशल एलटीटीहून रात्री १०.१५ वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी ९.५० वाजता थिविम येथे पोहचेल. परतीला १७, २४, ३१ मार्चला रविवारी धावेल. थिविम येथून सकाळी ११ वा. सुटून त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता एलटीटीला पोहचेल.ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी स्थानकात थांबे आहेत.०१४४५/०१४४६ क्रमांकाची पुणे-थिविम साप्ताहिक स्पेशल १५, २२, २५ मार्चला शुक्रवारी धावेल. पुणे येथून सायंकाळी ६.४५ वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी ८.३० वाजता थिविम येथे पोहचेल. परतीला १७, २४, ३१ मार्चला रविवारी धावणारी स्पेशल थिविम येथून स. ९.४५ वाजता सुटून त्या दिवशी रात्री ११.५५ वाजता पुणे येथे पोहचेल.www.konkantoday.com