
गणपतीपुळे येथील जागा विक्री करण्याच्या बहाण्याने महिलेची ५७ हजार रुपयांची फसवणूक
गणपतीपुळे येथील जागा विक्री करण्याच्या बहाण्याने महिलेची ५७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुग्धा योगेश सामंत (रा. आठवडा बाजार, रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आहे. फसणूक प्रकरणी मुग्धा यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला.सुमित खेडेकर (रा. सोनवडे, ता. संगमेश्वर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमित याने आपल्या भावाच्या उपचारासाठी गणपतीपुळे येथील ४ गुंठे जागा विक्री करायची असल्याचे मुग्धा सामंत यांना सांगितले. त्यानुसार सामंत यांच्याशी जमिनीचा व्यवहार करुन ५६ हजार ७७० रुपये सुमित खेडेकर याने घेतले. पैसे घेतल्यानंतर सुमित याने मुग्धा सामंत यांच्याशी जमिनीचा व्यवहार केला नाही. तसेच ती जागा सामंत यांच्या नावे करून दिली नाही. सुमित याने आपली फसणवूक केली असल्याचे लक्षात येताच सामंत यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी सुमित खेडेकर याच्याविरूद्ध भादंवि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. www.konkantoday.com