
खेड तालुक्यातील धनगरवाडी येथे रस्त्याची सोय नसल्याने आजारी रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी करावा लागतोय डोलीचा वापर
खेड, तालुक्यात सुमारगडाच्या पायथ्याशी वसलेली मौजे जैतापूर गावातील पायरीचामाळ धनगरवाडी मात्र स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतरही रस्त्याच्या मुलभूत सुविधा होण्यासाठी शासनदरबारी संघर्ष करत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकही धनगरवाडी रस्त्याच्या मुलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही, असे जाहीर सभांमध्ये वारंवार विधान केले होते; परंतु त्यानंतर लोकप्रतिनिधींना त्या विधानांचा विसर पडल्याचे धनगरवाड्यांमधील विदारक दृश्य बघताना येते. आजही खेड तालुक्यातील अनेक धनगरवाड्या रस्त्यासाठी शासनदरबारी संघर्ष करत आहेत. पायरीचामाळ धनगरवाडी येथे रस्त्याची सोय नसल्याने आजारी रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी डोलीचा वापर करावा लागतो. धनगरवाडीसह तालुक्यातील धनगरवाड्यांना न्याय देण्याची मागणी महाराणी अहिल्यादेवी समाजप्रबोधन मंच, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रामचंद्र बाबू आखाडे यांनी केली आहे.www.konkantoday.com