कोकणातील शेतकर्यांसाठी समस्या ठरलेल्या माकडांच्या निर्बिजीकरणासाठी टास्क फोर्सची निर्मिती
कोकणात वानर, माकडांमुळे होणार्या नुकसानीबाबत लोकप्रतिनिधींसह कोकण कृषी विद्यापीठ आणि वनाधिकार्यांच्या नियुक्त अभ्यास गटाने शासनाला दिलेल्या अहवालात प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर वानर, माकडांचे निर्बिजीकरण करण्यााची शिफारस सुचवली होती. त्यानुसार आता प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. राज्यात आंबा, काजू, सुपारी, नारळ, फणस इत्यादी फळझाडे तसेच बांबू व फुलझाडे यांचा मोहोर, फुलोरा, पालवी इत्यादींचे वन्यप्राण्यांकडून नुकसान होण्याच्या घटना घडत आहेत. यासंदर्भात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात २ वर्षापूर्वी कोकणातील आमदारांनी सरकारचे लक्ष वेधल्यानंतर वनविभागाचे कोल्हापूर प्रादेशिक मुख्य वनरक्षक आर. एस. रामनुजम यांच्या अध्यक्षतेखाली कोकणातील आमदार, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक, कृषी आयुक्त आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रतिनिध यांचा एक अभ्यास गट नियुक्त केला.या अभ्यास गटाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सूचवतानाच वानर, माकडांचे निर्बिजीकरण करण्याची शिफारस सुचवली होती. हिमाचल प्रदेश या राज्यात माकड या प्राण्याची संख्या अती वाढल्याने त्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याचा उपक्रम २००७ पासून सुरू आहे. त्याचा खूप चांगला उपयोग माकडांची संख्या कमी करण्यात तसेच नियंत्रणात ठेवण्यास झाल्याने महाराष्ट्र सरकारनेही फळझाडांचे नुकसान टाळण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माकड, वानर यांचे निर्बिजीकरण करण्याचे करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन केला आहे. www.konkantoday.com