आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने मार्लेश्‍वर, टिकलेश्‍वर सुशोभिकरणासाठी २ कोटींचा निधी

संगमेश्‍वर तालुक्यात सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या श्री देव मार्लेश्‍वर देवस्थान व श्री टिकलेश्‍वर मंदिर सुशोभिकरणासाठी सुमारे २ कोटी रुपयांचा निधी चिपळूण संगमेश्‍वरचे आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला आहे. यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.आमदार शेखर निकम हे जनतेच्या समस्या जाणून घेत त्या मार्गी लावण्यासाठी झटत आहेत. विकास कामांच्या माध्यमातून गावांचा कायापालट करण्यासाठी धडपडत आहेत. पर्यटन स्थळांचा विकास होवून जास्तीत जास्त पर्यटकांनी तीर्थक्षेत्री भेट द्यावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमदार निकम कार्यरत आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button