स्टँडअप शोमध्ये राडा घालणाऱ्या शिंदे सेनेच्या १९ समर्थकांविरोधात गुन्हा दाखल!

मुंबईतील ‘हॅबिटॅट’ स्टँडअप कॉमेडी शोमध्ये तोडफोड आणि गोंधळ घालणाऱ्या शिवसेना युवासेना (शिंदे गट) सरचिटणीस राहुल कानल आणि इतर १९ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.हा गुन्हा भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विविध कलमांनुसार नोंदवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्याच्या माध्यमातून व्यंगात्मक टीका केल्यामुळे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा खार येथील स्टुडिओ शिंदेंच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री फोडला. कुणाल कामराने महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

ही टीका समाजमाध्यमावर पसरल्याने शिंदेंचे शिवसैनिक आक्रमक झाले. राहुल कनाल आणि सरमळकर यांनी पदाधिकार्‍यांसोबत जात कुणालच्या स्टुडिओमध्ये तोडफोड केली. त्यानंतर कुणाल कामराच्याविरोधात शिंदेंचे आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरी एमआयडीसी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button