
साखरी नाटे जेटी परिसराचा पर्यावरण अहवाल मराठीतून उपलब्ध करा
राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गयाळकोकरी येथील प्रस्तावित साखरीनाटे जेटी प्रकल्पाचा पर्यावरण मूल्यांकन अहवाल इंग्रजीमध्ये देण्यात आला आहे. हा अहवाल मराठीतून उपलब्ध झाल्याशिवाय जनसुनावणी घेण्यात येवू नये, अशी मागणी धाऊलवल्ली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत करण्ययात आली असून तसा ठराव पारीत करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आला आहे. धाऊलवल्ली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात गयाळकोकरी येथे साखरी नाटे जेटी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याची जनसुनावणी १४ मार्च रोजी सकाळी ११ वा. नाटे नगर विद्यामंदिर येथे होणार आहे. याबाबतचे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे पत्र प्राप्त झाल्यानंतर धाऊलवल्ली ग्रामपंचायतीत खास सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जेटीसंबंधी झालेला सर्व्हे ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून झाल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे साखरी नाटे येथील मत्स्य बंदराचा विकास प्रकल्पाच्या पर्यावरणविषयक जनसुनावणीला ग्रामस्थांनी विरोध दर्शवत प्रत्यक्ष घटनास्थळी येवून ग्रामस्थांना प्रस्तावित जागेचा खुलासा करून मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या प्रकल्पाचा पर्यावरण घातक मूल्यांकन अहवाल इंग्रजीमधून देण्यात आला आहे. www.konkantoday.com