
शासनाकडून वेळेत निधी मिळत नसल्याने कळंबस्ते येथील शासकीय पोल्ट्रीला घरघर
शासनाकडून वेळेत निधी मिळत नसल्याने कळंबस्ते येथील शासकीय पोल्ट्रीला घरघर लागली आहे. निधीअभावी पक्षांचे खाद्य खरेदी करताना अडचणी निर्माण होवू लागल्याने पशुधन विकास विभागाने पोल्ट्रीतील सर्व पक्षी विकले आहेत. त्यामुळे पोल्ट्रीमध्ये सध्या एकही पक्षी नसून तालुक्यात कुक्कुटपालन व्यवसायाला उभारी देणारी ही पोल्ट्री अखेरची घटका मोजत असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.
www.konkantoday.com