राज्य सरकारने रत्नागिरी जिल्हा कारागृहासाठी विशेष निधी उपलब्ध केला

राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील विविध कारागृहांमध्ये बांधकामांसाठी ५३.१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये रत्नागिरीच्या विशेष कारागृहाचाही समावेश आहे.राज्यातील ठाणे, येरवडा, अमरावती, यवतमाळ, सिंधुदुर्ग, गडचिरोली आणि रत्नागिरीतील विशेष कारागृहासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये ठाणे येथे तृतीय पंथीयांसाठीचे राज्यातील पहिले विशेष कारागृह उभारण्यात येणार आहे. यासाठी २ कोटी ६९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. येरवडा जेलमध्ये बराकींची संख्या वाढवण्यात येणार असून अमरावती मध्यवर्ती कारागृहात अधिकारीवर्गासाठी निवास व्यवस्था उभारणे प्रस्तावित आहे. रत्नागिरी येथील विशेष कारागृहात आवश्यक बांधकामासाठीही या निधीचा विनियोेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेग होणार आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button