
रत्नागिरी शहरात येणार्या पर्यटकांसाठी आता नाचणे व पावसमध्ये जलपर्यटनाचा नवा पर्याय उपलब्ध
रत्नागिरी शहरात येणार्या पर्यटकांसाठी आता नाचणे व पावसमध्ये जलपर्यटनाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. कांदळवन पर्यटन प्रकल्पांतर्गत दोन्ही ठिकाणच्या खाड्यांमध्ये जलसफरीची संधी मिळणार आहे.कांदळवन कक्ष, वनविभाग व कांदळवन प्रतिष्ठान यांच्या सहाय्याने कांदळवन संरक्षण व उपजिविका निर्माण योजनेंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील नाचणे गावात कांदळवन सहव्यवस्थापन समिती व मौजे पावस येथे कांदळवन सहव्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे. नाचणे समितीमार्फत नारायण मळी येथे काजळी कांदळवन पर्यटन प्रकल्प व पावस समितीमार्फत भाटीवाडी येथे गौतमी कांदळवन पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. काजळी कांदळवन पर्यटन प्रकल्प व गौतमी कांदळवन पर्यटन प्रकल्पाचे उदघाटन झाले.कांदळवन पर्यटन प्रकल्पामध्ये पक्षी निरीक्षण, कांदळवन अभ्यास फेरी, कांदळवन नौका सफारी याद्वारे कांदळवनाचे संरक्षण व संवर्धनाबाबत माहिती येणार्या पर्यटकांना देण्यात येईल. मौजे नाचणे येथे सरपंच तथा समितीचे अध्यक्ष ऋषिकेश भोंगले यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. www.konkantoday.com




