रत्नागिरी जिल्ह्यात पसरतेय गालगुंडाची साथ
रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी भागांसह ग्रामीण भागात सध्या गालगुंड आजाराची साथ पसरली आहे. लहान मुलांना या आजाराची लागण झाल्याने त्रस्त झाली आहेत. गालगुंड ताप, खोकला, घसादुखीसारखा त्रास जागवू लागतो. यामुळे खाजगी तसेच सरकारी रूग्णालयामध्ये उपचारासाठी अशा रूग्णांची संख्या देखील वाढली आहे. यावर घाबरून न जाण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. सद्या जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत ९ केसेस आरोग्य विभागाकडे नोंद करण्यात आल्या आहेत. www.konkantoday.com