रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील गोवा किल्ल्यावर रोप वे होणार
राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश होण्यासाठीचे प्रयत्न अंतिम टप्प्यात असतानाच गड-किल्ल्यांवरील पर्यटन वृद्धीसाठी राज्यातील ४० किल्ल्यांवर रज्जूपथ अर्थात रोपवे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने अभ्यास सुरू करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील गोवा किल्ल्यांचाही समावेश आहे.राज्य शासनाने नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडच्या सहकार्याने पर्वतमाला योजनेंतर्गत हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माध्यमातून सामंजस्य करारही करण्यात आला आहे.२०२२ मध्ये राज्यातील २० ठिकाणांचे प्रस्ताव होते. आता ही संख्या ४० झाली आहे. मुंबई, सातारा, नाशिक, नांदेड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड किल्ल्यांचा प्राथमिक यादीत समावेश होता. त्यानंतर सिंहगड, राजगड, शिवनेरी, लेण्याद्रीसह काही ठिकाणांचा समावेशही करण्यात आला.www.konkantoday.com