रत्नागिरीतील सुसज्ज पोलीस वसाहतीचे व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुसज्ज नऊ मजली इमारतीचे आज भूमिपूजन
राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पोलीस कर्मचार्यांच्या निवासस्थानासाठी गृह विभागाने सुमारे १२३ कोटी ९० लाख रू. चा निधी मंजूर केला आहे. १४ मार्च रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, , पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पूर्ण झाली आहे
रत्नागिरी पोलीस कर्मचार्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता. मात्र राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी-रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या वचनांची पूर्ती होणार आहे. जिल्ह्यातील सर्वात उंच टॉवर असलेली १५ मजल्यांच्या ३ इमारती उभ्या राहणार आहेत. त्यामध्ये तब्बल २२२ फ्लॅटसह पोलीस अधीक्षक कार्यालय उभारण्यात येणार आहे. रत्नागिरीतील पोलीस कर्मचार्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. याशिवाय सर्व प्रशासकीय कार्यालय एकत्रित असावीत हेतूने बांधण्यात येणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नऊ मजली इमारतीचा भूमिपूजनही माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे
www.konkantoday.com