महाप्रीत आणि कोकण रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी स्थानक येथे २००० टन क्षमतेचा निर्यात एकात्मिक शीतगृह प्रकल्प
कोकणातील शेतकर्यांना नाशवंत शेतीमाल शास्त्रशुद्ध पद्धतीने दीर्घकाळ साठवणूक करून त्यांना योग्य तो हमीभाव मिळविण्यासाठी अंदाजे २५ कोटींचा निधी खर्चून शीतगृहाची उभारणी रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे केली जाणार आहे. महाप्रीत आणि कोकण रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे २००० टन क्षमतेचा निर्यात अभिमुख कृषी उत्पादनपुरक शीतगृह उभारणी करण्यात येत आहे.या शीतगृहामध्ये कोकणात उत्पादित होणार्या सुप्रसिद्ध हापूस आंब्याची तसेच इतर नाशवंत शेतीमालाची दीर्घकाळासाठी साठवणूक करणे शक्य होणार आहे. तसेच परदेशात निर्यात करण्यासाठीची सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहे. या शीतगृहात आंबा-गर (मँगो पल्ब) दीर्घ काळासाठी साठवणूक करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे. आंबा, आंबा-गर तसेच इतर भाजीपाला व फळे ही नाशवंत असल्यामुळे आर्थिक नुकसान होवून शेतकरी संकटात सापडतो. या शीतगृहामुळे कोकणातील शेतकर्यांचा नाशवंत शेतीमाल शास्त्रशुद्ध पद्धतीने दीर्घकाळ साठवणूक करून त्यांना योग्य तो हमीभाव मिळवण्यास मदत होईल. www.konkantoday.com