बोगद्यानजिक पुलाचे गर्डर चढवण्याचे काम पूर्ण झाल्याने कशेडी बोगद्यातील एकेरी वाहतूक अखेर पूर्ववत
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील मुंबईहून गोव्याकडे जाणार्या एकेरी वाहतुकीला बोगद्यानजिक पुलाचे गर्डर चढवण्याच्या कामामुळे अचानक ब्रेक लावण्यात आला होता. अखेर हे काम पूर्ण झाल्याने गेल्या ४ दिवसांपासून बोगद्यातील बंद झालेली एकेरी वाहतूक मंगळवारी सायंकाळपासून पूर्ववत झाल्याने शिमगोत्सवासाठी गावी येणार्या चाकरमान्यांनाही दिलासा मिळाला आहे.शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग खात्याने २४ फेब्रुवारीपासून कशेडी बोगद्यातील वाहतूक मुंबईहून गोव्याकडे जाणार्या हलक्या वजनाच्या वाहनांसाठी खुली करण्यात आली होती. मात्र गेल्या ४ दिवसांपासून कशेडी बोगदा वाहतुकीसाठी अचानक बंद करण्यात आली होती. बोगद्यातील पुलाचे गर्डर चढवण्याच्या कामामुळे वाहतुकीला ब्रेक लावण्यात आल्याचे राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून सांगण्यात आले होते. www.konkantoday.com