तरूण मतदारांची संख्या वाढल्याने रत्नागिरीच्या खासदारांचे कौल तरूणांवर अवलंबून
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाची सध्या निवडणुकीसाठी चांगलीच तयारी सुरू आहे. कोणत्याही क्षणी निवडणुकीसाठी तयार राहण्यासाठी आता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील १ हजार ७१७ निवडणूक केंद्रांसाठी तब्बल १३ लाख १ हजार १४१ मतदार मतदान करणार असल्याचे सांगण्यात आले. १८ ते ३९ या वयोगटातील तरूण मतदारांची संख्या ४ लाख ९१ हजार ९४ असल्याने आता पुढील खासदाराचे भविष्य आता तरूणांच्या हातात आहे.संपूर्ण राज्यात राजकीय उलथापालथ सुरू असताना आता सर्वसामान्य नागरिकांचे मात्र निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे. राज्यात कोणत्याही क्षणी लोकसभेच्या निवडणुका लागू शकतात, अशी परिस्थिती सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर आता रत्नागिरी जिल्ह्यातही निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात येत आहे.www.konkantoday.com