चिपळूण नगर परिषदेने थकबाकीदारांची नळकनेक्शन तोडण्यास सुरूवात केली
चिपळूण नगर परिषदेने मंगळवारपासून थकबाकीदारांची नळकनेक्शन तोडण्यास सुरूवात केली आहे. पहिल्या दिवशी अनेकांना दणका देण्यात आला. मात्र पथक कारवाईला जातानच अनेकजण पैसे भरत असल्याचेही दिसून येत आहे.नगर परिषदेला मालमत्ता करातून चालू व थकीत मिळून सुमारे १५ कोटी ३९ लाख २७ हजार ५८३ रूपये तर पाणीपट्टी करातून चालू वर्षी व मागील थकबाकी मिळून सुमारे २ कोटी ४५ लाख ८८ हजार १३३ रुपये येणे अपेक्षित आहे. त्यापैकी आतापर्यंत ५० टक्केच वसुली झाली आहे. तर १०० टक्के वसुली करा असा आदेश शासनस्तरावरून प्राप्त झाला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपत आल्याने नगर परिषदेचा घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचा वेग वाढताना दिसत आहे. www.konkantoday.com