ग्रामीण भागातील महाविद्यालयीन तरूणीवर अत्याचार करणार्या उत्तर प्रदेशमधील तरूणाला १० वर्षाचा सश्रम कारावास
ग्रामीण भागातील पिडीत महाविद्यालयीन तरूणीवर अत्याचार केल्याप्रकरणी कारागृहात असताना तेथून फरार झालेल्या आरोपीला न्यायालयाने बुधवारी ३ हजार रुपये दंड व १० वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.अनुजकुमार स्वामीनाथ चौव्हान (३५, रा. सडापूर, इंडिया कोर्ट जि. गौंड, राज्य उत्तरप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना ८ ऑक्टोबर २०११ रोजी तालुक्यातील ग्रामीणच्या हद्दीत घडली होती. आरोपी चौव्हान याने कॉलेजमधून घरी जाणार्या तरूणीला रस्ता कुठे जातो अशी विचारणा केली. तिच्या मागोमाग जावून ती निर्जन रस्त्यावर आल्यावर तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरूद्ध भादंवि कायदा कलम ३७६ व ३४१ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०१२ ला आरोपी कारागृहातू फरार झाला होता. त्यानंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातून अटक केली होती. सध्या आरोपी जेलमध्येच होता. हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. अनिरूद्ध फणसेकर यांनी काम पाहिले. www.konkantoday.com