
औषध कंपन्यांच्या खर्चाने डॉक्टरांना परदेशात जाण्यास बंदी, भेटवस्तू ही स्वीकारता येणार नाही
केंद्र सरकारने मंगळवारी औषध कंपन्यांवर ताशेरे ओढले. सरकारने औषधांच्या मार्केटिंगसाठी एकसमान आचारसंहिता जाहीर केली असून कोणतीही फार्मा कंपनी कोणत्याही डॉक्टरांना भेटवस्तू देणार नाही किंवा डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांना कार्यशाळा आणि सेमिनारच्या नावाखाली परदेशात पाठवणार नाही, त्यांच्या प्रवासाचा खर्च उचलणार नाही. देशातील इतर शहरांमध्ये आणि महागड्या हॉटेलमध्ये देखील त्यांना ठेवणार नाहीत. असे आढळल्यास दोघांवरही कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, एखाद्या कार्यशाळेत किंवा सेमिनारमध्ये डॉक्टर वक्ता असेल तर त्याला यातून सूट देण्यात येणार आहे, असे नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगण्यात आले आहे.फार्मास्युटिकल्स विभागाने औषधांच्या विक्रीतील गैर प्रकार टाळण्यासाठी फार्मास्युटिकल असोसिएशनसह फार्मास्युटिकल मार्केटिंग प्रॅक्टिसेस (UCPMP) २०२४ साठी युनिफॉर्म कोड तयार केला आहे. यासोबतच, विभागाने फार्मास्युटिकल असोसिएशनना एकसमान संहितेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी आचारसंहिता समिती स्थापन करण्याचे देखील निर्देश दिले आहेत. या सोबतच UCPMP 2024 मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्यास या संबंधीच्या तक्रारी हाताळण्यासाठी देखील वेगळे मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत.www.konkantoday.com