अकराशे कोटी रुपयांच्या गुंतवणूक कराराचे जिल्हा फेडरेशन कडून स्वागत
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नव्याने उद्योग उभारणाऱ्या 1100 कोटी रुपये गुंतवणूक करणाऱ्या 55 उद्योजकांचे रत्नागिरी जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज वतीने स्वागत करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये हे उद्योग उभारले जाणार असून उद्योग मंत्री नाव उदयजी सामंत यांचे हस्ते गुंतवणूक करार करण्यात आले.लोटे परशुराम औद्योगिक वसाहती मधील अनेक उद्योजकांनी विस्तारीकरणासाठी शासनाच्या या योजनेचा लाभ घेतला. मिलिंद बापट, निरंजन आपटे, प्रदीप मुळगावकर, आर एस डी पॉलिमरचे बागवे, अम्को पेस्टिसाइड, प्रीव्ही ऑरगॅनिक आधी उद्योजकांनी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात समवेत गुंतवणूक करार केले.रत्नागिरी जिल्हा गुंतवणूक परिषदेमध्ये 55 उद्योजकांनी 1100 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे करार केले. रत्नागिरी जिल्हा फेडरेशन चे अध्यक्ष डॉ प्रशांत पटवर्धन, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत सेक्रेटरी केशव भट,लोटे उद्योजक संघटनेचे अध्यक्ष राज आंब्रे, मिलिंद बारटक्के, राजकुमार जैन, किसन चव्हाण, दादा कदम,शशी देसाई यांनी उद्योजकांचे अभिनंदन केले आहे.www.konkantoday.com