
कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळाचा इशारा कोकणात आणि काही जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार.
हवामान खात्याने (IMD) इशारा दिला आहे चक्रीवादळ शुक्रवारी किनारपट्टीला धडकू शकते.आयएमडीने म्हटले आहे की, पुढील 12 तासांत वारे चक्रीवादळात रुपांतरित होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत ते भारतीय किनारपट्टीपासून दूर पश्चिम-वायव्य दिशेने सरकेल.” हवामान विभागाच्या (IMD) इशाऱ्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुरुवारी रात्री गांधीनगरमधील राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्रात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणारमहाराष्ट्रात देखील याचा परिणाम पाहायला मिळू शकतो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. तर काही भागात अजूनही पाऊस सुरु आहे. पुढील 24 तासांत गडचिरोली, चंद्रपूर, विदर्भात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे.कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बंगालच्या उपसागरासापर्यंत पाऊस सक्रिय आहे. हवामानाचा महाराष्ट्रावर देखील परिणाम पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांसात काही ठिकाणी हायअलर्ट दिला आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.1 सप्टेंबरपर्यंत कोकणात आणि काही जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भात 11 जिल्हयामध्ये सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलंय. मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.