
सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र घुडे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान
रत्नागिरी जिल्हा सेवानिवृत्तांच्या जनसेवा समितीचे माजी अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे सचिव श्री सुरेंद्रघुडे यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे जाहीर करण्यात आलेला समाजभूषण पुरस्कार दिनांक 12 मार्च रोजी मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला त्याबद्दल श्रीराम मंदिर यश नागरिक कट्ट्याचे मुख्य संयोजक श्री सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये आणि प्रसिद्धी प्रमुख श्री प्रभाकर कासेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे श्री सुरेंद्र जी घुडे यांचे या पुरस्काराबद्दल विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहेwww.konkantoday.com