
परत एकदा लॉकडाऊनची सर्वत्र अफवा
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढत असल्याने परत एकदा लॉकडाऊन होणार असल्याची पोस्ट सध्या सोशल मिडियावर फिरत असून त्यामुळे हा विषय सर्वत्र चर्चेचा झाला आहे. मात्र यात काहीही तथ्य नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक प्रांताधिकार्यांना परिस्थितीनुसार लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. मात्र सध्या तरी असे कोणत्याही प्रकारे लॉकडाऊन होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे
www.konkantoday.com