
रत्नागिरी बसस्थानकाचे कामाला हळुहळू सुरूवात, पदाधिकार्यांनी दिली बसस्थानकाला भेट
_दीर्घकाळ रखडलेल्या येथील बसस्थानकाच्या सध्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत व किरण सामंत यांच्या आदेशानुसार रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शिवसेना नेते सुदेश मयेकर, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये यांनी कंत्राटदार तावडे यांना घेवून चालू असलेल्या नवीन कामाची पाहणी केली.शिवसेनेचे माजी नगरसेवक निमेश नायर, शहर संघटक संकेत घाग, माजी नगरसेविका कौशल्या शेट्ये, महिला शहर संघटक श्रीम. वीणा रेडीज, सौरभ मलुष्टे, युवा तालुका शहर प्रमुख अभिजित दुडये, मंदार आंब्रे, विनोद सावंत, बाळू गांगण, प्रशांत सुर्वे, संजना जोशी, पप्पू सुर्वे आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.www.konkantoday.com