रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री देवी भगवतीच्या शिमगा उत्सवाची रूपरेषा
शिमगा उत्सव दिनांक १४/३/२०२४ ते ९/४/२०२३ रोजी साजरा होणार आहे*दिंनाक १४/३/२०२४ रोजी पाग पंचमी उत्सव*दिनांक १५/३/२०२४ षष्टी उत्सव**षष्ठी उत्सव*- दुपारी १:३० वा. देवी भगवती मंदिरातून निघेल, तेथून भागेश्वर मंदिर मार्गे, राम मंदिर मार्गे, भैरव मंदिर येथे भावाची हातभेट घेण्यासाठी जाईल, तिथून मुरलीधर मंदिर मार्गे, काँग्रेस भवन मार्गे, जोगेश्वरी मंदिर येथे जाईल, तिथून झाडगाव नका मार्गे, गाडीतळ मार्गे, नवलाई पावणाई मंदिर येथे जाईल, तेथून पोलीस स्टेशन येथे महापुरुषाला भेट देऊन, गार्हाणे घालून, परत धनजी नाका मार्गे, काँग्रेस भवन मार्गे, भैरव मंदिर मार्गे, राम मंदिर मार्गे, भागेश्वर मंदिर मार्गे, भगवती मंदिर येथे येईल*दिनांक २४/३/२०२३ होळी उत्सव**होळी आण्याचा मार्ग* – श्री देवी भगवती दुपारी ठिक १:३० वाजता मंदिरातुन निघेल, तेथुन भागेश्वर मंदिर मार्गे,राम मंदिर मार्गे,स्नॅक कॉनर, मुरुगवाडामार्गे, भोळेवाडीमार्गे, मिर्याबदंर अनुराधा राजन सुर्वे यांच्या घरी कोंडी येथे जाईल.तेथुन होळी ठिक ३/०० तोडुन भोळे वाडी मार्गे,झाडगाव नाका मार्गे, टिळक आळी मार्गे,कॉग्रेस भुवन मार्गे, मुरलीधर मंदिर मार्गे,भैरव मंदिर मार्गे,ठिक ६/०० वाजता पेठकर यांच्या ताब्यात देण्यात येईल.तेथुन ठिक ८वाजता हनुमान वाडी यांच्या ताब्यात देण्यात येईल.तेथुन भागेश्वर मंदिर येथे येईल.तेथुन हनुमान पार येथे १०वाजता येईल.तेथुन ११ वाजता भगवती मंदिर येथे येईल.व ठिक १२ वाजता देवीचा होळीचा होम लावण्यात येईल.*दिनांक २५/३/२०२३ धुळीवदंन उत्सव*देवी ठीक २:३० वाजता मंदिरातून निघेल तिथून चव्हाटा देव ,होळदेव, खंडोबा, वेताळ, गणपती, मारुती, या सर्व देवांवर धूळवड उडवेल, तेथूनमुख्य मानकरी सावंत यांच्या घरातील देवावर, मंदिरातील देवावर, हनुमान पार येथील मारुती वर, पुरातन गणेश मंदिर वर धुळवड उडवेल. तेथून भागेश्वर मंदिर मार्गे, राम मंदिर मार्गे, भैरी मंदिर येथे जाईल, तेथून गुजर यांच्या घरी, तेथुन काँग्रेस भवन मार्ग टिळक आळी येते खैर यांच्या घरी जाईल, तेथून झाडगाव येथे सावंत यांच्या घरी जाईल, तेथून जोगेश्वरी मंदिर मार्गे परत भगवती मंदिर येथे येईल.*दिनांक ३०/३/२०२३ रोजी रंगपंचमी उत्सव*सायंकाळी ५ वाजता प्रथम श्री देवी भगवती च्या अंगावर रंग उडवून,श्री देवी भगवती रंग खेळायला मंदिरातून निघेल. तेथून चव्हाटा होळदेव, खंडोबा, वेताळ, गणपती, मारुती या देवांवर रंग उडवेल, तेथून मुख्य मानकरी यांच्या घरातील देवावर रंग उडवेल, तेथून त्यांच्या मंदिरातील देवावर रंग उडवेल, तेथून हनुमान पार येथील मारुती देवावर रंग उडवेल, तिथून पुरातन गणपती मंदिर येथे रंग उडवेल, तेथून परत श्री देवी भगवती मंदिरात येईल. व रात्रौ ठीक बारा १२ वाजता देवीचा आराबा तटबंदीवर प्रदक्षिणा घातली जाईल व प्रत्येक मानकराला मानाचे नारळ प्रसाद वाटप करण्यात येईल.*९/४/२०२४ रोजी गुढीपाडवा उत्सव व सांगता*सकाळी ७ वाजता गुढी उभारणे व पूजा करणे, रात्रौ ठीक १२ वाजता निशान काठी उतरवणे. व देवीच रूप उतरवणे, व भगवती देवीला गार्हाणे घालून शिमगा उत्सव सांगता करणे.www.konkantoday.com