
मुंबई-गोवा महामार्गावरील निगडे येथे दुचाकी अपघातात दोघे जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील निगडे येथील भारत पेट्रोलसमोर सोमवारी स. ८.४५ च्या सुमारास झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. गाय आडवी आल्याने दुचाकीला अपघात झाल्याचे सांगण्यात आले.जनार्दन जानकर (२२), संगीता काळे (१९), अशी जखमींची नावे आहेत. अपघाताचे वृत्त कळताच सामाजिक कार्यकर्ते सुरेश हंबीर यांनी रूग्णवाहिकेसह घटनास्थळी जात त्यांना घरडा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. www.konkantoday.com