
मनसे रिक्षा सुंदरी स्पर्धेत देवरूखच्या साई पुसाळकर यांची रिक्षा प्रथम
संगमेश्वर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मनसे रिक्षा संघटना देवरूख यांच्यावतीने घेण्यात आलेल्या रिक्षा सुंदरी स्पर्धेत देवरूखच्या साई पुसाळकर याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.पंचायत समिती समोरील मैदानावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत दापोलीच्या शुभम नरवणकर द्वितीय क्रमांक, प्रसाद दुर्गावळे (दापोली) तृतीय क्रमांक तर संकल्प शिंदे (रत्नागिरी) यांची उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली. पर्यवेक्षक म्हणून सुरज कासेकर, अभिजित भाटकर, सदानंद गायकवाड यांनी काम पाहिले. स्पर्धेदरम्यान आमदार शेखर निकम, रविंद्र माने, रोहन बने, जितेंद्र चव्हाण, अनुराग कोचिरकर, सागर संसारे, शेखर नलावडे, मकरंद नलावडे, नुरूल सिद्धीकी, सान्वी संसारे, अक्षय झेपले, ऋतुराज देवरूखकर यांसह मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. www.konkantoday.com