
भास्करावांना कान पिळवटण्याचा अधिकार आहे पण त्यांच्या नाराजीवर मार्ग काढू -खा. विनायक राऊत
आमदार भास्कर जाधव आमचे आदरणीय नेते आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, त्यांना कान पिळवटण्याचा अधिकार आहे. त्यांचं स्थान आमच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये मोठं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा त्यांच्याशी योग्य वेळेला बोलतील आणि पुढचा मार्ग आम्ही काढू असे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांचे पत्र संदेश सोशल मिडियाच्या माध्यमातून जोरदार व्हायरल झाल्याने त्यावरून ते नाराज असल्याची चचा होत आहे. पण त्या चर्चेचे खासदार विनायक राऊत यांनी खंडण केले आहे. www.konkantoday.com