पाण्याची पातळी खालावत असल्याने दापोलीकरांवर पाणीटंचाईचे संकट
वाढत्या तापमानामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत जात असल्याने दापोली नगर पंचायतीने पाणी कपात जाहीर केली असून आता दापोलीकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.दापोली शहराला नारगोली व कोडजाई या दोन ठिकाणच्या नळपाणी योजनेतून दिवसाला सुमारे २५ लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. दापोली शहरामध्ये सुमारे २ हजार ५०० नळ जोडण्या आहेत. याद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र नारगोली व कोडजाई येथे अपुरा पाणीसाठा उपलब्ध असल्याने मार्च महिन्यापासून दरवर्षी दापोलीकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.www.konkantoday.com