
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवादासाठी १४ मार्चला गुहागर, दापोलीत
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा जनसंवाद मेळावा १४ मार्च रोजी गुहागर व दापोली तालुक्यात होणार आहे. या मेळाव्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. शृंगारतळी येथे दुपारी १२ वाजता सभा होणार आहे. तर दापोलीतील आंबेडकर चौकात दुपारी दोन वाजता सभा होणार आहे.आरजीपीपीएल कंपनीच्या मैदानात ठाकरे यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. तेथून ते शृंगारतळीकडे सभेसाठी येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी दिली. जिल्ह्यात विविध पक्षांच्या नेत्यांनी गुहागरकडे लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या महिन्यातच निलेश राणे आणि नुकतीच रामदास कदम यांची सभा झाली. चिपळूण येथील सभेत आमदार भास्कर जाधव यांनी स्थानिक पातळीवर स्वपक्षीयांवरच तोंडसुख घेतले आहे. यावरही ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.www.konkantoday.com