
नाचणे ग्रामपंचातीने उभारलेल्या मैला गाळ प्रकल्पाची हिमाचलमधील अधिकार्यांकडून पाहणी
रत्नागिरी शहरानजिकच्या नाचणे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ व जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या सहकार्याने मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित झाला असून हिमाचल प्रदेश राज्यातील कांगडा प्रकल्प कार्यान्वित झाला असून हिमाचल प्रदेश राज्यातील कांगडा धर्मशाळा येथील पदाधिकार्यांनी या प्रकल्पाला भेट दिली.या भेटी दरम्यान सदर प्रकलपाअंतर्गत कशा प्रकारे रहिवासी वस्तीमध्ये सेक्शन व्हॅनद्वारे जमा होणार्या मैलावर कशा प्रकारे प्रक्रिया केली जाते याबाबत अभ्यासपूर्वक व प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती घेतली. याबाबत सदर पदाधिकार्यांशी चर्चा करताना हिमाचल प्रदेश व कोकण या दोन प्रदेशांच्या विभिन्न भौगोलिक परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.या कमिटीमध्ये सौरभ जस्सल (आयएएस) उप आयुक्त, कांगडा, संजीव राणा, राज्य समन्वयक (स्वच्छ भारत मिशन ग्रा), शम्मी राज सहाय्यक नियंत्रक (एफ ऍण्ड ए), भानू प्रताप सिंग, गटविकास अधिकारी, अनशुल शंदिल, गट विकास अधिकारी, कल्याण जग्गी उपस्थित होते.यावेळी नाचणे ग्रामपंचायत उपसरपंच निलेखा नाईक, गणपत खरंबळे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी व जि.प. रत्नागिरी संदेश महाडदळकर, मजगांवकर हे स्वच्छ भारत मिशनचे अधिकारी उपस्थित होते.www.konkantoday.com