दिवा ते रोहा नियमितपणे धावणाऱ्या मेमू लोकलच्या चिपळूणपर्यंतच्या . १५ ते ३० मार्च २०२४ पर्यंतच्या सर्व विस्तारित फेऱ्या रद्द
दिवा ते रोहा या मार्गावर नियमितपणे धावणाऱ्या मेमू लोकलच्या चिपळूणपर्यंतच्या . १५ ते ३० मार्च २०२४ पर्यंतच्या सर्व विस्तारित फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.मागील दोन वर्षांपासून केवळ गर्दीच्या हंगामात दिवा- रोहा मेमू चिपळूणपर्यंत विस्तारित केली जात असल्याने रेल्वेला रोहावासीय प्रवाशांचा रोष ओढवून घ्यावा लागला होता. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी रोहा येथे संतप्त प्रवाशांनी या विस्ताराविरोधात ‘रेल रोको’ करून चिपळूणपर्यंत विस्तारित केलेली मेमू रद्द करायला भाग पाडली होती. यावेळी तशी वेळ येऊ नये, यासाठी रेल्वेने सावध पवित्रा घेत विस्तारित केलेली ही गाडी आधीच रद्द केली आहे.
. ८ मार्च पासून दिवा ते रोह्यादरम्यान धावणारी मेमू लोकल ट्रेन चिपळूणपर्यंत विस्तारित करण्यात आली होती. ही गाडी शून्य ,०१५९७/०१५९८ या क्रमांकाने विशेष मेमू गाडी म्हणून चालवली जात होती.
दिवा ते रोहा या मार्गावर आधीच सेवेत असलेली गाडी विस्तारित करण्यात आली होती. मात्र, मागील काही दिवस ही गाडी विलंबाने धावत असल्याने चिपळूण येथून रोह्याला जाताना पुढे रोहा ते दिवा या नियमित फेऱ्यांना देखील विलंबाचा फटका सहन करावा लागत होता. यामुळे मागील अनुभव लक्षात घेता नियमित प्रवाशांचा रोष ओढवून घेण्याआधीच चिपळूण मेमूच्या १५ ते ३० मार्च पर्यंतच्या सर्व फेऱ्या रेल्वेने रद्द केल्या आहेत.
www.konkantoday.com