जनआक्रोश समितीच्या पदाधिकाऱ्यांची शिमगोत्सवात कोकणकरांचा प्रवास सुरक्षित व सुखरूप व्हावा याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पनवेल कार्यालयावर धडक
पनवेल-(प्रतिनिधी:- गणेश नवगरे.)मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या नवनियुक्त कार्यकारीणी पदाधिकाऱ्यांची शिमगोत्सवात कोकणकरांचा प्रवास सुरक्षित व सुखरूप व्हावा याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पनवेल कार्यालयावर धडक व सोबतच कोकणभवन येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्यअभियंता श्री.संतोष शेलार यांच्या कार्यालयास स्मरण पत्र देण्यास भेट.सदर वेळी NHAI च्या प्रोजेक्टइम्पिमेटंल युनिट पनवेल मुख्य प्रकल्प अधिकारी श्री.यशवंत घोटकर व श्री.सत्यम शेठ हे हजर होते.पळस्पे ते इंदापूर या टप्प्यातील महामार्ग चौपदरीकरणात होणाऱ्या दिरंगाई,वाकण, कोलाड,नागोठणे,आमटेम येथील शेतकरी प्रश्न,अपुऱ्या प्रवासी सुविधा , दिशादर्शक फलक , दुभाजक व दिशापरिवर्तनाचे फलक यावर चर्चा करण्यात आली.काही ठिकाणी सदोष बांधकाम व निकृष्ट दर्जाच्या बांधकाम साहित्यामुळे गाडी चालवताना हवेत गाडी चालवण्याचा अनुभव येतो.तसेच काम चालु असलेल्या ठिकाणी डायव्हर्जनचे फलक नसल्याने अचानक एकमार्गी वाहतुक करताना अपघात होण्याचा धोका आहे हे त्यांच्या निदर्शनास आणुन दिले व तसे फलक दोन दिवसात लावण्यात आश्वासन घेण्यात आले.अन्यथा समितीच्या वतीने महामार्गावर रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाईल व त्या अभियानात रस्ते सुरक्षा नियंमांचे पालन व वेगमर्यादा राखण्याबाबत घोषवाक्य असलेले बॅनर समितीतर्फे लावण्यात येतील असे ठणकावून सांगितले. त्यानंतर जनआक्रोशची टिम बेलापूर येथील कोकण भवनातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात भेट घेण्यात आली.इंदापूर बायपास, माणगाव बायपास, परशुराम घाटातील अपघात ग्रस्त ठिकाण, सुरक्षेचा अभाव,चिपळूण व रत्नागिरी मधील रखडलेला काम या संदर्भात चर्चा करण्यात आली.०२ दिवसांपूर्वी जनआक्रोश समितीच्यावतीने परशुराम घाटातील धोकादायक वळण , बॅल्कस्पॅाट परिस्थिती दाखविण्यात आली होती सदर ठिकाणी त्वरित सूचनाफलक लावत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन घेण्यात आले.सदर सभेला जनआक्रोश समितीचे अध्यक्ष श्री.अजय यादव साहेब,कोशाध्यक्ष-संजय जंगम साहेब, उपाध्यक्ष-सुरेंद्र पवार साहेब,उपाध्यक्ष-भारती जळगावकर मॅडम,सहसचिव-चैतन्य पाटील साहेब, सहसचिव-रुपेश भोगल साहेब,सहखजिनदार-अनिल जोशी साहेब, प्रशासकीय कामकाज प्रमुख-दिलीप नांदोस्कर साहेब,समाज माध्यम प्रमुख-अजय हेगडे साहेब, नियोजन समिती प्रमुख-ऋषी महाडीक साहेब, सोशल मीडिया प्रमुख राज गुजर साहेब उपस्थित होते.शिमग्यापुर्वी कोकणकरांना प्रवास या महामार्गवरून करताना कोणतीही अडचण किंवा व्यत्यय येऊ नये, वाहतुक कोंडी होऊ नये म्हणुन समिती सदस्य वाहतुक पोलीस व प्रशासनास सर्व प्रकारचे सहकार्य व सहयोग देण्यास तयार आहे.www.konkantoday.com