खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएसच्या भोसले दांपत्याने आंबा उद्योगासाठी मिळवले उपयुक्त पेटंट
खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस महाविद्यालयातील माहितीशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र व संगणक शास्त्र विभागाचे समन्वयक डॉ. सचिन भोसले, तसेच व्यवस्थापनशास्त्र विभागातील त्यांच्या पत्नी डॉ. विजया भोसले यांनी कोकणात प्रथमच जिल्ह्यातील आंबा उद्योगातील डिजिटल मार्केटींग आणि व्यवसाय विश्लेषण उपकरण तयार करून त्याचे पेटंट मिळविले आहे. आंबा उत्पादकांना कोणत्या प्रदेशात किंवा देशात त्यांच्या आंब्याला चांगली मागणी असेल, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे या उपकरणाद्वारे सांगितले जाणार आहे.या नाविन्यपूर्ण उपकरणाचा कोकणातील आंबा व्यावसायिकांना, उत्पादकांना खूप मोठा फायदा होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून येथील स्थानिक आंबा उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हे उपकरण महत्वपूर्ण ठरणार आहे. डिजिटल मार्केटींगद्वारे तसेच आंब्याच्या किंमतीतील चढ उतार, तसेच गुणवत्तेबाबत काही सूचनाही दिल्या जाणार आहेत. नुकतेच यासाठीचे पेटंट भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डॉ. सचिन भोसले व त्यांच्या पत्नी डॉ. विजया भोसले यांनी मिळवले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराचंद बुटाला, कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ऍड. आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉ. अनिता आवटी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. www.konkantoday.com