केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड 10 वी, 12 वी परीक्षा केंद्रावर 2 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
*रत्नागिरी, दि. 13 :- केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत इ. 10 वी व इ. 12 वी ची परीक्षा बालभारती पब्लिक स्कूल, RGPL, पो. अंजनवेल, ता. गुहागर, रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल, खेड बैतवाडी, ता. खेड, सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, जालगांव (पांगरवाडी), ता. दापोली, नवनिर्माण हाय इंग्लिश मिडीयम स्कूल, पी-63, एमआयडीसी, मिरजोळे, ता. रत्नागिरी, जवाहर नवोदय विद्यालय, पडवे, ता. राजापूर, श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचे इंग्लिश मीडियम स्कूल, कासारवाडी, सावर्डे, ता. चिपळूण,श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडीयम श्री समर्थ कृपा विश्वास, वेरळ, बाजुला खेड रेल्वे स्टेशन, ता. खेड, पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी, सिध्दीविनायक रेगालिअ, कुवारबाव कारवांचीवाडी, रविंद्र नगर, ता. रत्नागिरी या परीक्षा केंद्रावर 02 एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सकाळी 10 वा. ते दुपारी 1.30 वा. या वेळेत घेण्यात येणार असून परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2.30 वाजेपर्यंत वरील परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आला आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षेच्या दिवशी 2 एप्रिल 2024 पर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 प्रमाणे जिल्ह्यातील वरील 10 वी, 12 वी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश पारीत केला आहे. या आदेशान्वये परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल, असे कृत्य करता येणार नाही. 100 मीटर परिसरातील एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण इ. माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहील. हे आदेश परीक्षा केंद्रांवर काम करणारे अधिकारी/कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी/पोलीस अधिकारी यांचेबाबत त्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत, मात्र त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील. या आदेशाची जो अवमान्यता करील तो भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.www.konkantoday.com