सफाई मोहीम राबविल्याने घेरा यशवंतगड बुरूजांनी घेतला मोकळा श्वास
राजापूर तालुक्यासह लांजा, रत्नागिरी येथील शिवप्रेमींनी तालुक्यातील नाटे येथील घेरा यशवंतगड येथे साफसफाई मोहीम राबवत किल्ल्यातील वाढलेली झाडे-झुडपे तोडून बुरूजावरती झालेले अतिक्रमण मोकळे करण्यात आले आहे. बुरूजाभोवतीची वाढलेली झाडी दूर झाल्यामुळे गडाच्या बुरूजांनी मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे किल्ल्याला भेट देण्यासाठी येणार्या गडप्रेमींना किल्ला व्यवस्थित पाहता येणार आहे.राजापूर तालुक्यातील नाटे येथील यशवंतड किल्ल्याचा परिसर विस्तीर्ण असून अनेक वर्षे किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याने मोठ्या प्रमाणात झाडे वाढली आहेत. त्यामुळे किल्ला पूर्णपणे झाड, वेलींनी झाकून गेला होता. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे महत्वपूर्ण अंग असलेले व मावळ्यांच्या बलिदानाने पावन झालेले गडकोट म्हणजे स्वराज्याचा अनमोल ठेवा आहे. या किल्ल्याचे जतन आणि संवर्धन व्हावे, या हेतूने या गडकोट स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.www.konkantoday.com