
नोंदीत बांधकाम कामगारांना बुधवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरक्षा संच वाटप
*रत्नागिरी, दि. 12 : कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृह उपयोगी साहित्य वाटप उद्या बुधवार दि.13 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते स्वा. वि.दा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी दिली. उद्या होणाऱ्या या कार्यक्रमासाठी खासदार विनायक राऊत, खासदार सुनिल तटकरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, आमदार अनिकेत तटकरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, सिंधुरत्न समृध्द योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य सदस्य किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत.www.konkantoday.com