
देवरूख-संगमेश्वर बसचा अपघात प्रकरणी चालकावर लवकर कारवाई करण्याचे विभाग नियंत्रकांचे आश्वासन
देवरूख-संगमेश्वरकडे करजुवे वस्तीची गाडी घेवून येणारा बसचालक अमित आपटे यांच्यावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र राज्य परिवहन महामंडळ कारवाई काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना गुन्हा दाखल झालेल्या चालकावर महामंडळ लवकरच कारवाई करणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी सांगितले.देवरूख आगाराची देवरूख-संगमेश्वर ही बस घेवून चालक अमित आपटे हे संगमेश्वरला येत होते. लोवले येथे आले असता त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली होती.www.konkantoday.com