
अजित आशाताई अनंतराव पवार’ नावाची पाटी कौतुकाचा विषय, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरील पाटी चर्चेत
_राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनाबाहेरील नावाची पाटी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ यांना मिळाला आहे.मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरील ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ नावाची पाटी कौतुकाचा विषय ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनाबाहेरील अजित पवार नाव बदलून आता त्या जागी अजित आशाताई अनंतराव पवार या नावाची पाटी लावण्यात आली राज्याचं चौथं महिला धोरण 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी लागू करण्यात आलं. यानंतर पहिल्याच कार्यालयीन दिवशी मंत्रालयात ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ नावाची पाटी झळकली. यंदा राज्य सरकारने जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्चला राज्याचं चौथं महिला धोरण जाहिर केलं. या चौथ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचा मान उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजनमंत्री अजित पवार यांनी पटकावला.www.konkantoday.com