वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावाने साकारलेल्या ‘कवितेच्या गावा’चे उदघाटन
थोर कवी मंगेश पाडगावकर यांचा आज जन्मदिन दिनाचे औचित्य साधून त्यांच्याच उभादांडा या जन्मगावी भारतातील पहिल्या ‘कवितांचे गाव’ या दालनाचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्याची संधी मला मराठी भाषा मंत्री असताना मिळत आहे, याचा मला आनंद आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी उभादांडा येथे बोलताना केले.महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग व राज्य मराठी विकास संस्था यांच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावाने साकारलेल्या ‘कवितेच्या गावा’चे उदघाटन व लोकार्पण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आज संपन्न झाले.www.konkantoday.com