रोहा(रायगड) येथील विश्वविक्रमी शिवराज्याभिषेक महारांगोळी साकारण्यामध्ये चित्रकार सुरज दत्ताराम धावडे यांचा सहभाग
रायगड मधील रोहा तालुक्यातील भुवनेश्वर मैदानामध्ये साकारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या सव्वा लाख चौरस फुटाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या रांगोळीमध्ये संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे गावचे सुपुत्र श्री. सुरज धावडे यांनी महत्वपूर्ण सहभाग नोंदवला.. सांगली येथील श्री .राजीव पाटिल यांच्या ऑल इज वेल प्रॉडक्शन ग्रुप च्या वतीने सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबई व स्थानिक भागातील मिळून किमान ६० ते ७० कलाकारांनी या महारांगोळीसाठी सहभाग नोंदविला… याचे प्रायोजक रायगडचे खासदार श्री. सुनिल तटकरे होते . ही रांगोळी १४ तारखेपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खूली असेल. www.konkantoday.com