
रत्नागिरी जिल्ह्याचे तरुण तडफदार युवा नेते अॅड श्री बंटी वणजू यांची रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) तालुकाध्यक्ष पदी निवड
राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव अॅड श्री बंटी वणजू यांची रत्नागिरी राष्ट्रवादी (अजितदादा पवार गट) तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तरुण तडफदार युवा नेते म्हणुन त्यांनी जनतेच्या न्याय्य हक्कासाठी अनेक आंदोललने केली आहेत लोकसभा निवडणूकीच्या धरतीवर त्यांची तालुकाध्यक्ष पदी झालेली निवड ही त्यांनी केलेल्या जनतेच्या कामांची पोचपावतीच म्हणावी लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रत्नागिरी तालुक्याची जबाबदारी अॅड श्री बंटी वणजू यांच्यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आणि रत्नागिरी रायगड चे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार सुनील तटकरे, मा.आमदार आदितीजी तटकरे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचेचे लोकप्रिय आमदार श्री शेखर निकम,विधानपरिषद आमदार श्री अनिकेतदादा तटकरे, प्रदेश सचिव श्री बाप्पा सावंत, प्रदेश सरचिटणीस आणि सिंधु-रत्न सदस्य तसेच प्रदेश सरचिटणीस श्री अजित यशवंतराव रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) जिल्हाध्यक्ष श्री बाबाजी जाधव यांनी सोपविली असून या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री बाबाजी जाधव यांचे कडुन तालुकाध्यक्ष पदाचे पत्र घेताना अॅड श्री बंटी वणजू, शाम्भवी वणजू, प्रदेश सचिव श्री बाप्पा सावंत, सिंधु-रत्न सदस्य तसेच प्रदेश सरचिटणीस श्री अजित यशवंतराव, जिल्हा उपाध्यक्ष श्री नारायण खोराटे, पप्पु तोडणकर, प्रणित चव्हाण, राकेश आंब्रे, नितीन रोडे निलेश खोराटे आदि उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष अॅड श्री बंटी वणजू यांनी रत्नागिरी तालुक्याचीही कार्यकारिणी जाहीर केली त्या मध्ये तालुका उपाध्यक्ष श्री पप्पु तोडणकर, तालुका उपाध्यक्ष श्री कैलास आडवीलकर शहर अध्यक्ष मंदार नैकर, शहर कार्याध्यक्ष मुबीन शहा, शहर उपाध्यक्ष राकेश आंब्रे,महिला तालुका सौ संध्या नाईक, महिला शहर अध्यक्ष सौ प्रणिता कोतवडेकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष ताजुद्दीन खलिपे,अल्पसंख्यांक शहरअध्यक्ष राहील मुकादम, सरचिटणीस फारूक शहा युवक विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश खोराटे यांनाही नियुक्ती पत्र देण्यात आली या पुढे भाजप शिवसेना (शिंदे गट) सोबत खांद्याला खांदा लावून काम करू आणि जो जनतेचे काम करणार नाही त्याला कैलासवासी आनंद दिघे साहेबांच्या स्टाईलने उत्तर देऊ आणि जनतेसाठी कायम रस्त्यावर उतरु आणि गाव तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शाखा निर्माण करू असे प्रतिपादन नवनियुक्त तालुकाध्यक्ष अध्यक्ष अॅड श्री बंटी वणजू यांनी केले आहेwww.konkantoday.com