शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शासकीय विश्रामगृह असलेल्या सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये आरक्षण प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती आहे.काही दिवसांपूर्वी राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेत आरक्षणावरून निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी आपण मध्यस्थी करावी, अशी विनंती पवार यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आजची भेट झाल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button