दीपक नोव्होकेन कंपनीत अंगावर रसायन पडून दोन कामगार भाजले
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील दीपक नोव्होकेन कंपनीत अंगावर रसायन पडून दोन कामगार भाजले. प्रतिक कांबळे (रा. खेर्डी-चिपळूण), प्रशांत कदम (वालोटी-चिपळूण) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी कराड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हे दोघेजण कंपनीत फीटर म्हणून काम करत होते. रासायनिक प्रक्रिया सुरू असतानाच अचानक वॉल्व्हला हात लागल्याने रसायन बाहेर उडून त्यांच्या चेहर्यावर उडाल्याने ते जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी तातडीने चिपळूण येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी कराड येथे हलविण्यात आले आहे.www.konkantoday.com