
उद्धव ठाकरे तुम्हाला मदत करणार नाहीत, हे आतातरी तुमच्या लक्षात आले असेल: निलेश राणे
_शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या बाबतीत निलेश राणे यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर करुन आपल्या भावना मांडल्या. त्यांनी म्हटले की, भास्कर जाधव यांनी त्यांचे सहकारी त्यांना सोडून का गेले, यासाठी आत्मचिंतन केले पाहिजे. तुम्ही रडण्याचा कार्यक्रम बंद करा आणि कामाला लागा, तुमचे सहकारी तुमच्याकडे परततील की नाही बघा. मलाही तो काळ आठवतो, जेव्हा मी तुमच्या पाया पडायचो, तुम्हाला काका बोलायचो. मी देखील ते दिवस विसरलेलो नाही. तुमच्यासोबत अनेक आठवणी आहेत, त्या आम्ही आजही विसरलेलो नाही. पण तुम्ही असेच वागत राहिलात तर आमच्यासारखी तरुण मुले जी तुमच्याकडे काका म्हणून आदराने पाहत होती, ती तुमच्यापासून लांब गेली. तुम्ही डोंगरावर जाऊन एकटे बसा आणि या सगळ्याचा विचार करा. हा विचार करताना, ‘मी कोण आहे’ ही भावना बाजूला ठेवा, असा सल्ला निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना दिला.उद्धव ठाकरे तुम्हाला मदत करणार नाहीत, हे आतातरी तुमच्या लक्षात आले असेल: निलेश राणेनिलेश राणे यांनी आपल्या व्हीडिओतून भास्कर जाधव यांना एक आवाहन केले. आतातरी भास्कर जाधव यांनी चिपळूणच्या लोकांना खोट बोलून फसवू नये. हे त्यांचे खोटे बोलायचे वय नाही. हे वय नातवंडांना खेळवण्याचे आहे. नेहमी तुमच्या मदतीसाठी कोणतातरी सहकारी धावून येणार, ही अपेक्षा ठेवू नका. आताचं राजकारण तसं राहिलेलं नाही. लोकांना आता खरं-खोटं समजतं. उद्धव ठाकरे हे तुम्हाला फक्त वापरुन घेणार, याची कल्पना तुम्हाला एव्हाना आली असेल. चिपळूणमधील मागच्या घटनेनंतर ही बाब तुमच्या लक्षात आली असेल. त्या घटनेनंतर महाराष्ट्रातील लोक तुम्हाला डोक्यावर घेतील, असे तुम्हाला वाटले होते. पण तसे काही झाले नाही. पण तुम्ही तुमच्याच दुनियेत मश्गूल असता, त्यामधून बाहेर पडा, असे निलेश राणे यांनी सांगितले.www.konkantoday.com